सोळशी ओळख
सातारा जिल्ह्यामधील कोरेगाव तालुक्यात सोळशी हे ठिकाण आहे. सोळशी म्हणजेच सोळा शिवलिंगांची भुमी. तसेच या भुमीत शनीदेवाचे आस्त्तिव आहे. पुण्यापासून अवघ्या दोन तासांच्या अंतरावर असलेल्या या अध्यात्मिक भुमीवर अनेक भक्तगणांची श्रद्धा आहे. हरळीचा डोंगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भल्यामोठ्या टेकडीच्या पायथ्याला असलेली ही भुमी आवर्षणग्रस्त भाग असल्याने मधल्या काळात तशी दुर्लक्षित होती . मात्र श्री तिर्थक्षेत्र सोळा शिवलिंग शनैश्वर देवस्थानमुळे आता अनेक भाविकांचा राबता या भुमीत होत आहे.
प्राचीन ग्रंथ व दस्ताऐवजात ‘महादेवाचे खोरे’ किंवा ‘सत्यनगरी’ म्हणून सोळशी या भुमीचा उल्लेख आढळतो. नागरी संस्कृतीचा उदय झाल्यावर गावाची हद्द ठरविण्यासाठी वेगवेगळ्या जागी शिवलिंची स्थापना केली जात असावी. त्याच प्रकारे सोळा शिवलिंगांची स्थापना सोळशी परिसरातील डोंगरी कपाऱ्यात केलेली आढळते. त्यामुळेच की काय या शिवलिंगाच्या डोंगराची ओळख पुढे सोळशी या नावाने रुजू झाली आहे.