सोळशी परीसरातील शिवलिंगे

सोळशीतील काही शिवलिंगे ही बंदिस्त शिवालयात आहेत तर काही मोकळ्या माळरानांवर आहेत. मात्र या भुमीत पांडवांचे काहीकाळ वास्तव्य असल्याचे दाखले मिळतात. डोंगरावरील प्राचीन वास्तू शिल्पे व श्रीशाळुपानेश्वर शिवालय हे आपल्या प्राचीनतेच्या काही खुणा अद्यापही जपून आहे. सोळशी हा डोंगर परीसर ६०% कोरगावमध्ये तर २०% वाई आणि २०% खंडाळा तालुक्यात मोडला जातो. सोळशीच्या पवित्र भुमीत वसना नदीचा उगम होतो पुढे ती लुप्त होऊन कृष्णानदीत विलीन होते.

श्री हरेश्वर

श्री हरेश्वर तेजुतमु किंवा श्री हरेश्वर नावाने पुजले जाणारे हे शिवलिंग खरेतर चार सुळके आहेत. जसे अग्नी, वायु, जल, प्रकाश जीवनासाठी आवश्यक तसे हे चार सुकळे म्हणजे नवसाला पावणारा, संकटाला धावणारा, मनाला शांती देणारा आणि सत्याची दिशा देणारा परमेश्वर होय अशी भक्तांची श्रद्धा आहे

श्री भुवनेश्वर/भुमेश्वर

श्री भुवनेश्वर/भुमेश्वर हे शिवलंग म्हणजे आदीमाया त्रिनेत्री शक्ती होय. या शिवलिंगाच्या दर्शनाने आपली वौचारिक पातळी बदलते शरीरावर भक्तीचे अलंकार चढल्याचा भाव उत्पन्न होऊन मनुष्य कुठल्याही भौतिक अलंकाराच्या मोहाला बळी पडत नाही असे म्हणतात

श्री सोळकेश्वर/सोकोबा

श्री सोळकेश्वर/सोकोबा या शिवलिंगाची पुजा-आर्चा केल्याने वाचासिद्धी प्राप्त होते. येथे जवळच पुरातन झरा असून त्याला भागिरथी नदीचा उगम म्हणतात. येथे दर १२ वर्षांनी भागिरथी नदीचा उगम होतो असे म्हणतात. साधारण हंडा बुडेल एवढे पाणी येथे असते. मात्र हे पाणी काही काळ रहाते व परत गुप्त होते

श्री नागेश्वर

श्री नागेश्वर पटांगणात असलेल्या श्री नागेश्वर या शिंवलिंगामुळेच या गावाला नायगाव असे संबोधले जाऊ लागले असे म्हणतात. श्री नागेश्वर हे नायगावचे ग्रामदैवत असून त्याच्या पुजनाने हिस्त्रप्राणी, साप यांच्याबद्दल मनात भिती निर्माण होत नाही असे म्हणतात .

श्रीशाळुपानेश्वर

श्रीशाळुपानेश्वर या शिवलिंगाची भक्ती करत करत ऋषी कश्यप नवरु/सळुपानेश्वर यांना मुक्ती मिळाली त्यांची साक्ष म्हणून हे शिवलिंग श्रीशाळुपानेश्वर म्हणून ओळखले जाते.)

श्री मुक्तेश्वर

श्री मुक्तेश्वर श्रीशाळुपानेश्वरच्या बाहेरील पटांगणात ऋषी कश्यप नवरु/सळुपानेश्वर यांची समाधी आहे. या ठिकाणी ऋषींना मुक्ती मिळाल्याने या लिंगाला श्री मुक्तेश्वर म्हणतात

श्री प्रतिकेश्वर

श्री प्रतिकेश्वर पृथ्वीवरील प्रत्येक जीवाला सत्याचा मार्ग देणारे त्यांच्यातील वाईट प्रवृत्ती नष्ट करणारे , सत्याचे बीज पेरणारे आणि प्रेरणा देणारे शिवलिंग म्हणजे प्रतिकेश्वर होय.

श्री खंडेश्वर

श्री खंडेश्वर या शिवलिंगाची पुजा-अर्चा केल्याने स्वाभिमानी जगण्याचे महातम्य प्राप्त होते आणि बुद्धीला चालना मिळते व तो मनुष्य उच्चशिक्षित होतो. कधी अपयश त्याच्या पदरी नसते.

श्री महांतेश्वर/म्हातेश्वर

श्री महांतेश्वर/म्हातेश्वर या शिवलिंगाची पुजा-आर्चा केल्याने संचितातील पाप नष्ट होते . म्हणून या शिवलिंगास महातेज देणारा म्हातेश्वर म्हणतात.

श्री भिवतेश्वर

श्री भिवतेश्वर श्री भिवतेश्वर या शिवलिंगाची पुजा-आर्चा केल्याने बुद्धीला चालना मिळते. ती व्यक्ती यशाच्या शिखरावर विराजमान होते.

श्री हराळेश्वर

श्री हराळेश्वर जे काही भोगले ते येथेच सोडून पुढे जाऊया, मुक्ती मिळवण्याचा प्रयत्न करूया असा भाव मनात प्रकट करणारे शिवलिंग म्हणजे श्री हराळेश्वर होय.

श्री ओंकारेश्वर

श्री ओंकारेश्वर श्री ओंकारेश्वर हे शिवलिंग म्हणजे जे जगाची उत्पत्ती करतात, पालन करतात, संहाकर करतात त्या त्रिमुर्तींची आठवण होय.

श्री धारेश्वर

श्री धारेश्वर श्री हरेश्वराच्या पाठीमागे हे शिवलिंग असून त्याची भक्ती म्हणजे पुण्य आणि करुणाकृपा होय.

श्री खिंडेश्वर

श्री खिंडेश्वर या शिवलिंगाची पुजा-आर्चा करणाऱ्यास स्वाभिमानी जीवन जगण्याची प्रेरणा मिळते

श्री तळेश्वर

श्री तळेश्वर आत्माची तहान भागल्याची अनुभुती देणारे शिवलिंग तळेश्वर म्हणून पुजले जाते.

श्री कोल्हेश्वर

श्री कोल्हेश्वर या शिवलिंगाची पुजा-आर्चा केल्याने ऐश्वर्य प्राप्त होते. अनेक भवनिका विद्या प्राप्त होतात.

संपर्क

Telephone:9765186929, 8275371395
Email: info@shanidevsolshi.org, avinashlembhe2012@gmail.com
Website: www.shanidevsolashi.org

श्री तिर्थक्षेत्र सोळा शिवलिंग शनैश्वर देवस्थान, सोळशी.

ता. कोरेगाव, जि. सातारा -४१५५१७

महाराष्ट्र