शनीला काय पसंत नाही
शनि हा ग्रह मंदगतीचा, न्यायप्रिय, कष्टप्रधान, बुध्दिमान, व्यवहारचतुर, दक्ष, सावध पवित्रा असलेला, ध्येयवादी वृत्तीचा, कठोर, कर्तव्यपरायण आणि अगदी क्वचितप्रसंगी क्रुरवृत्तीचा, थंडपणे बदला घेणारा, सुडप्रवृत्तीचा सुद्धा आहे. साडेसातीच्या त्याच्या भ्रमणकाळात शनिच्या नैसर्गिक न्यायबुध्दीनुसार तो “न्यायदानाचे” कार्य करत असतो म्हणजे तो तुमच्या हातुन घडलेल्या कर्मांना न्याय देतो. कुकर्मे, अपराध, अनैतिकता, फसवणुक, लुबाडणुक यांचा न्यायनिवाडा तो त्याच्या पध्दतीने अत्यंत शांतपणे आणि कठोरपणे करतो. त्याला अहंकार अजिबात पसंत नाही त्यामुळे तो अहंकारी व्यक्तीचे आकाशात जोरात उडणारे विमान अलगद जमिनीवर आणतो.
शनी उपासना
-
साडेसाती / अडिचकी सुरु असताना शनिवारी कोणत्याही स्वरुपात / कोणत्याही परिस्थितीत मांसाहार / मद्यपान करु नये. या गोष्टींचा श्री शनिमहाराजांना तिटकारा आहे.
-
शनिवारी संध्याकाळी शनि / मारुती मंदिरात जाऊन मुर्तीवर थोडे तीळाचे / मोहरीचे तेल + ११ काळे अख्खे उडीद एकत्र करुन अर्पण करावे. मानसिक ताणतणाव असतील तर या मिश्रणात किंचित मीठ एकत्र करुन अर्पण करावे. हा अर्पणविधी संध्याकाळी सुर्यास्तानंतरच करावा.
मारुतीला ११ प्रदक्षिणा कराव्यात.
साडेसातीत मारुतीची किंवा श्रीशनी यापैकी एकचीच उपासना करावी. दोन्ही उपासना एकत्र करु नयेत.
मारुतीची उपासना करायची असेल तर वरील उपायांसोबत रोज सकाळी मारूती स्तोत्राचे वाचन करावे किंवा श्रीहनुमानचालिसा/श्री बजरंगबाण किंवा हनुमान वडवानल स्तोत्र यांचे वाचन करणेही लाभदायक असते. शनिवारी संध्याकाळी अगरबत्ती लावुन मारुतीचे स्मरण करुन रामचरितमानसधील “श्रीसुंदरकांडा”चे वाचन करणेही अती लाभदायक असते.
श्रीशनी उपासना करायची असेल तर रोज सकाळी व संध्याकाळी करावी. त्यासाठी मंत्र पुढील प्रमाणे -
-
॥ ॐ नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजम
छायामार्तंड संभूतं तं नमामि शनैश्चरम ॥
या शनिमंत्राचा किमान १०८ वेळा जप करावा
-
॥ ॐ सुर्यपुत्रो दीर्घदेही विशालाक्ष शिवप्रिय:
मंदचार प्रसन्नात्मा पीडां हरतु मे शनि: ॥
या पीडाहरण मंत्राचा १०८ वेळा जप करावा
किंवा
-
-
शनी उपासना करतांना शनिवारी संध्याकाळी पश्चिमाभिमुख एका काळ्या रंगाच्या घोंगडी किंवा ब्लॅन्केटवर बसुन समोर एक चंदन अगरबत्ती व तीळाच्या तेलाचा दिवा लावुन एकाग्रचित्ताने व शांतपणे-सलगतेने “श्रीशनिमहात्म्य” पठण करावे.
-
श्री शनिचालिसा स्तोत्र रोज वाचावे.
-
साडेसाती सुरु असताना व नसतानाही शनिमहाराजांचे प्रार्थनापुर्वक दर्शन घेऊन यावे. अनवधानाने झालेल्या अपराधांची क्षमा मागावी.