देवस्थान विषयक

गेल्या काही वर्षात भविकांचे श्रद्धास्थान बनलेले श्री तिर्थक्षेत्र सोळा शिवलिंग देवस्थान, सोळशी हे ठिकाण वाईच्या पुर्व भागातील वेळे या गावापासून सोळशीकडे जाणाऱ्या घाटच्या पलीकडे असलेले ठिकाण. आज दिसणाऱ्या देवस्थानची निर्मीती. प. पू. शिवयोगी नंदगिरी महाराज यांच्या विचारातून झाली असली तरी त्याची प्रेरणा गुरुवर्य श्री. प. पू. त्यागेश्वर महाराज यांच्या कृपेने मिळाली आहे.

प. पू. शिवयोगी त्यागेश्वर महाराज परिचय

filler image

गुरुवचन

॥ सत्य कधी सोडू नकोस ॥

॥ स्वाभिमान कधी विकू नकोस ॥

॥ लाचारी कधी स्विकारू नकोस ॥

नसानसात शिवभक्ती रुजलेले परमपुज्य त्यागेश्वर महाराज यांचे मुळ नाव – श्री. नामधारी चिंतामणी शिंदे. मात्र त्याचे मुळ गाव, कुटुंबीय याची माहिती कोणालाही नाही. वयाच्या सोळाव्या वर्षी घराचा त्याग करून सत्याच्या शोधात गुरू भेटीच्या ओढीने ते प्रवास करू लागले. सोळा शिवलिंगाच्या भुमीत त्याचा आत्मा रमला आणि ते सोळशीत कायमचे राहू लागले. त्यांनी मोह, मत्सर, अहंकार, संसार, ऐहिक सुखाची साधने, संपत्ती यांचा त्याग केला असल्याने लोक त्यांना त्यागी महाराज म्हणू लागले.

त्याचे कठोर पण सत्यवचन यामुळे त्यांना अनेक प्रकारचा त्रास सहन करावा लागला. मात्र त्याचे सत्य वागणे, सद्‌विचार आणि लोकोद्धाराची तळमळ पाहून श्री. दिनकर आबा सोळस्कर यांच्याशी त्याचे वैचारिक मैत्रीचे ऋणानुबंध जुळले. श्री सोळस्करांच्या बहिणीच्या मालकीच्या जागेत आपल्याला शनीदेवाची प्राणप्रतिष्ठापना करायची आहे असा मानस त्यागी महाराजांनी व्यक्त केल्यानंतर त्याच्या बहिणीने त्याला अनुमती दिली. याच जागी त्यागी महाराज झोपडी बांधून शनीदेवांची पुजा-अर्चा, धर्म प्रसाराचे कार्य करत असे. आपल्यानंतर आपला उत्तराधिकारी या कार्याला मुर्त रुप देईल याबद्दल ते नेहमीच गावकऱ्यांशी बोलत असे. गुरूवचनानुसार त्याचे उत्तराधिकारी प. पू. शिवयोगी नंदगिरी महाराज यांनी (संस्थानाची ट्रस्ट म्हणून नोंदणी करून) सोळशी येथे आज दिसत असलेल्या मंदिर व परीसराची नीटनेटकी व्यवस्था लावलेली आहे. गुरू कृपेच्या प्रेरणेतून इथे आज अनेक प्रकारचे कार्य केले जाते.

प. पू. शिवयोगी नंदगिरी महाराज परिचय

filler image

गुरुवचन

॥ भुकेल्याची भुक जाणा, ताहानलेल्याची तहान जाणा; हाच खरा धर्म ॥

॥ दान म्हणजे धनधान्य, संपत्ती,एखादी वस्तू एवढच नसून दान चांगले शिक्षण, चांगले विचार रुजवणे हेसुद्धा मोठे दान आहे ॥

॥ मोहाचे बंधन जोपर्यंत आपण तोडत नाही, तोपर्यंत खरे आत्मज्ञान प्राप्त होत नाही ॥

‘विचार बदला, नशिब बदलेल’, असे विचार प्रत्येक भाविकाच्या मनात रुजवित सोळशी श्री तिर्थक्षेत्र सोळा शिवलिंग देवस्थानाला मुर्त रुप देणारे प. पू. शिवयोगी नंदगिरी महाराज हे उस्मानाबाद मधील उमरगा तालुक्यातील मुरुम/मुढम गावचे. परमपुज्य त्यागेश्वर महाराज यांनी भक्तीची जी परंपरा सुरु केली ती परंपरा पुढे चालवण्यासाठी नंदगिरी महाराज आज अखंड शनीभक्ती आणि भक्तसेवेत मग्न आहेत. ३१ जुलै १९९९ साली त्यांचे आगमन या पुण्यभुमीत झाले. पुढे गुरुवचन आणि साक्षात शनीदेव यांच्या आदेशानुसार नंदगिरी महाराजांनी आधीच्या शनीमंदिराचा जीर्णोद्धार व परीसराचे सुशोभन केले आहे. नंदगिरी महाराजांच्या पुढाकाराने आज येथे अनेक चांगल्या सोईसुविधा निर्माण झालेल्या दिसतात. तसेच त्यांनी संस्थानाची ट्रस्ट म्हणून नोंदणी करून विविध समाजोपयोगी उपक्रम व कार्यक्रम सुरु केले आहेत.

ट्रस्टीची यादी

श्री . रुपचंद संगप्पा गुंडगोऴे उर्फ प. पु. नंदगिरी महाराज - मठपती

श्री . बबन दत्तोबा देशमुख - अध्यक्ष

श्री . अरविंद विठ्ठलराव शिंदे - उपाध्यक्ष

श्री . बाऴासो भिकोबा यादव - कार्यवाहक

श्री . अशोक कदम - सचिव

श्री . अविनाश सदाशिव धुमाऴ - खजिनदार

श्री . राजूशेट कांतीलाल लोढा

श्री . शंकरराव मुरलीधर विभूते

श्री . राजेंद्र मधुकर महाजन

श्री . माणिकराव जयदिंगराव पाटील

श्री . श्रध्दा रुपचंद गुंडगोऴे

श्री . दिगंबर जगन्नाथ नाचण

श्री . किरण बबन देशमुख

श्री . वैभव अशोकराव कदम


सोळशी अख्यायिका

कृतयुगात महादेव खोऱ्यात हरेश्वर शिवालयाच्या ठिकाणी माता पार्वती व महादेव फिरत फिरत आले आणि शिवालयात बसून सारीपाट खोळू लागले. मंदिराचा गुरव हा खेळ उत्सुकतेने पाहात होता. त्याला पार्वतीने विचारले; खरे सांगा हा डाव कोणी जिंकला? त्यावर तो म्हणाला, शिवाने जिंकला! दुसरा डाव रंगला. तो डाव माता पार्वतीनें जिंकला आणि पुन्हा विचारले; आता हा डाव कोणी जिंकला? त्यावर गुरव म्हणाला, शिवाने जिंकला! गुरव असत्य बोलला म्हणून पार्वतीने त्याला कोडी होशील असा शाप दिला आणि कैलासात निघून गेली.

अंगावर कोड उठल्याने गुरव दुःखी झाला. त्यावेळी एक माता हरिश्वराची पुजा करण्यासाठी शिवालयात आली. तिने गुरवला कोडाबद्दल विचारले असता त्याने झाला प्रकार सांगितला. तेव्हा त्या मातेने या परीसरातील सोळा शिवलिंगाची पुजा कर व त्याच्या नावाने सोळा सोमवाराचे व्रत कर असा उपाय सुचवला. तेव्हापासून सोळा सोमवार व्रताची परंपरा सुरु झाली असे सांगतात. या व्रताने गुरवाचे कोड बरे झाल्याची अख्यायिका सांगतली जाते.

कृत युग सुरु असतांना ब्रह्मदेव वैदर्भ देशातील सत्यलोकनगर (म्हणजे सोळशी) येथे तपस्येसाठी बसलेले असतांना मधु व किटक या दोन दैत्यांनी त्यांना व जनतेला अतोनात त्रास दिला. तेव्हा ब्रह्मदेवांनी त्याच्याशी युद्ध सुरु केले मात्र मोठा काळ गेला तरी युद्ध संपेना. आपला निभाव लागणार नाही असे समजुन ब्रह्मदेवांनी महादेवांची आराधना केली. तेव्हा महादेवांनी आदीमायाशक्ती जिला हेमवती/त्रिनयनी असेही म्हणतात तिला मोहिनी रुपाने या भुमीत पाठवले. आदीमायाशक्ती हेमवतीने दौत्यांवर मोहास्त्र सोडले.

मोहास्त्राला भुलून दोन्ही दैत्यांनी मोहिनीला वर मागण्यास सांगितले तेव्हा आदीमायेने तुम्हाला देवाच्या हातून मृत्यु यावा असा वर मागितला. वचनबद्ध दैत्यांनी आपला देह वधासाठी हवाली केल्यावर देवानी त्यांना शेवटची इच्छा विचारली. तेव्हा मधु व किटक दैत्य म्हणाले, तेजतमु रुद्राने लिंग बनून व मस्तकी हेमवतीच्या उगमाचे ओझे धारण करून या भुमीत सात अवतार घ्यावेत. ब्रह्मदेवांनी त्या शिवलिंगाची पुजा करावी जेणेकरून जो कोणी या लिंगाची पुजा करेल त्याला आदीमाया शक्ती प्रसन्न होईल.

पुढे महादेवांनी सोळा शिवलिंगाच्या रुपाने या भुमीत वास्तव्य केले मात्र माझ्यामुळे दैत्यांचा अंत झाला या गर्वात जाऊन हेमवती/त्रिनयनी सत्यनगरीत तेजतमु हरेश्वराच्या शिवालयात मोहिनी स्त्रीचे रुप घेऊनच राहू लागली. आदीमाया हेमवती/त्रिनयनी ही जलरुप न होता वचन भंग करत आहे हे कळताच सत्यवचनी शनैश्वर सत्यनगरीत आले. मात्र हेमवतीने आपले नाव वसुमती असे बदलुन ती सुर्यपुत्र शनीदेवालाच भुलवण्याचा प्रयत्न करू लागली. तेव्हा शनीदेवांनी तिला तू सत्यवचनाने न राहिल्यास मी तुला छळेन असे सांगितले. हे ऐकताच वसुमतीने तेजतमु हरेश्वराच्या उजवीकडे जलरुपाने उडी घेतली.

शनैश्वरांनी तिला वर मागण्यास सांगितले असता, “जो कोणी माझ्या पतीची (सोळा शिवलिंगांची) पुजा करेल त्याला मी दर्शन देईल. त्याचबरोबर तुझेही वास्तव्य या भुमीत असू दे, इथे येणाऱ्या भाविकाला छळू नकोस”; असे वरदान शनीदेवाकडे मागितले.

आजही ही आदीमाया शक्ती वसना नदीच्या रुपाने छोट्या छोट्या सात कुंडातून आपल्याला दर्शन देते. तसेच या सिद्ध भुमीत सोळा शिवलिंगाच्या रुपाने महादेव आणि सत्यप्रिय शनीदेव यांचे आस्तित्व आहे.


संपर्क

Telephone:9765186929, 8275371395
Email: info@shanidevsolshi.org, avinashlembhe2012@gmail.com
Website: www.shanidevsolashi.org

श्री तिर्थक्षेत्र सोळा शिवलिंग शनैश्वर देवस्थान, सोळशी.

ता. कोरेगाव, जि. सातारा -४१५५१७

महाराष्ट्र